नगराध्यक्षपदासाठी संजय जाधव, एमआयएमकडून सोफीयान शेख या दोन उमेदवारांचे तीन अर्ज दाखल

Foto
शहरातील १० प्रभागात २२ उमेदवारी अर्ज दाखल
गंगापूर, (प्रतिनिधी)। नगर परिषद निवडणुकीत १५ नोव्हेंबर रोजी दाखल झालेल्या उमेदवारी अजाँची प्राथमिक यादी जाहीर झाली असून यंदा उमेदवारांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. नगराध्यक्ष पदासाठी दोन उमेदवारांचे तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तसंच १० प्रभागांमध्ये आतापर्यंत २२ उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. पुढील आज आणि उद्या शेवटच्या दिवस असून दिवसांत प्रमुख पक्षांचे उमेदवार अर्ज दाखल करणार असल्याने अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर निवडणुकीची खरी लढत रंगणार आणि राजकीय गणिते पालटण्याची शक्यता आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अद्याप दोन दिवस शिल्लक असून पुढील दोन दिवसांत भाजप, शिवसेना (शिंदे गट), उबाठा, राष्ट्रवादी (शरद पवार) गट आणि काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत चौरंगी नव्हे तर पंचरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. शनिवारी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी नवनाथ वगवाड व सहाय्यक निर्णय अधिकारी संतोष आगळे यांनी दिली.

विशेष म्हणजे अद्याप नगराध्यक्ष पदासाठी भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि उबाठा या गटांकडून एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व एमआयएम या दोन पक्षांच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे
गंगापूर नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारी अर्जाची संख्या वाढत असून राजकीय वातावरण तापू लागले आहे.

नगराध्यक्ष पदाचे उमेदवार : 
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार संजय विठ्ठलराव जाधव, एआयएमआयएम तसेच अपक्ष सोफियान सिराज शेख या नात्यानेही अर्ज दाखल झाले आहे.
गंगापूर नगर परिषदेसाठी नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणारे पुढीलप्रमाणे: प्रभाग क्रमांक दोन मधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाचे) उमेदवार माजी नगरसेविका जाधव सुवणाँ संजय, माजी नगरसेवक लक्ष्मणसिंग राजपूत यांचे पुत्र योगेश लक्ष्मण राजपूत प्रभाग क्रमांक ३ मधून: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सामाजिक कार्यकर्ता अमोल सुभाष जगताप, प्रभाग क्र. ५ मधून : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाचे) संतोष पंढरीनाथ काटकर प्रभाग क्र. ६ मधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाचे) उमेदवार सय्यद अख्तर हशम आहे. प्रभाग क्र. ७ अ. मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार सुरेश लक्ष्मण नेमाई आहे. 

१) बिजला ज्ञानेश्वर साबणे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रभाग क्र. ८ मधून एम आय एग पक्षाकडून १) असेफा सोयब तांबोळी २) शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सविता लक्ष्मण शहाणे प्रभाग क्रमांक ८ व मधून एम आय एम पक्षाचे शहराध्यक्ष बासोलान फैसल इस्लाम आहे. प्रभाग क्र. ९ मधून अ. १) रुक्साना बेगम मुजीब शेख राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाचे) २) पठाण शहनाज समंद एमआयएम ३) जहूरी सबानाज अकबर अपक्ष : १) बाकोदा अबरार अय्यूब अपक्ष २) माजी नगराध्यक्ष फैसल अब्दुला चाऊस राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ३) बागानून अवद गालेब (एमआयएम) प्रभाग क्र. १० मधून अ१) कृष्णा बाळू गायकवाड काँग्रेस २) वैभव मारुती धनायत भाजप ३) मारुती कारभारी धनायत भाजप ४) कृष्णा बाळू गायकवाड अपक्ष व मधून देवका ज्ञानेश्वर जाधव (अपक्ष) सोनाली योगेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे सदस्य यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.